महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन


- आसा येथील नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय कमलापूर अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम भागात असलेल्या मौजा आसा येथे जिल्हा वार्षिक योजना  जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून लहान बालकांना सोईचे झाले असल्याने आज सदर अंगणवाडी केंद्रांच्या नवीन ईमारतीच्या उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या नवीन अंगणवाडी केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम उपसरपंच सचिन ओल्लेटीवार, नरेंद्र गर्गम, कोरके कुळमेथे, विज्याजी गावडे, बिछू कुळमेथें, मुकेश तलांडी, डोलू, कोरके गावडे, रमेश मडावी, दस्सा गावडे, बकाय्या चौधरी, मासेक्का गावडे, राजु आत्राम, गोविंदा गोंगले, अंगणवाडी सेविका सौ.रेखाताई गोंगले रोहिनिताई गावडे, चंद्रकला , राजेंद्र चोधरी, रामचंद्र कडारलावार, मलेश माने, सतीश काटेकर, रहांगडाले , राजेंद्र चौधरी व अंगणवाडीतील लहान बालक व पालक वर्ग उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos