महत्वाच्या बातम्या

 भामरागड येथे ६ दिवसीय ग्रीष्मकालीन योग प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : धर्मराव शिक्षण मंडळ, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालित राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालय, भामरागड येथे आयोजित ६ दिवसीय ग्रीष्मकालीन योग प्रशिक्षण शिबिराचा यशस्वी समारोप नुकताच झाला.

या शिबिरामध्ये विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शिबिरादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना सूक्ष्म व्यायाम, विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यान यांचे प्रशिक्षण दिले गेले. एकूण १६ विविध योगासनांचा सराव करून सहभागींच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याबाबत जनजागृती केली गेली.

शिबिराचे प्रमुख प्रा. विशाल तावेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. प्रा. तावेडे यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, योग फक्त शारीरिक स्वास्थ्यासाठी नाही, तर मन व आत्म्याच्या संतुलनासाठीही अत्यंत आवश्यक आहे.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमराज लाड यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. तसेच लिपिक रूपलाल गोंगले, प्रशांत आगलावे, शिपाई सुनील ताजने, रमेश गाडगे, बंडू बोंडे आणि विवेक येरगुडे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.

शिबिराच्या अंतिम दिवशी सर्व सहभागींचा सामूहिक योगाभ्यास घेण्यात आला. त्यानंतर सहभागींचे अनुभव जाणून घेण्यात आले व शेवटी सर्वांच्या उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देत शिबिराची औपचारिक सांगता करण्यात आली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाने भामरागडमध्ये योगाभ्यासाची जागरूकता वाढली असून, भविष्यात अशा प्रकारच्या उपक्रमांची अपेक्षा वाढली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos