पाकिस्तान भारताविरोधात रचतोय 'षडयंत्र'; 'संशयास्पद' सॅटेलाइट 'फोटो'


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने आपल्या कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैन्य भारताविरोधात कारवाया करत आहे. करामती पाकिस्तानाने आता धोकादायक कारवाया रचण्यास सुरुवात केली आहे. या करमातीमध्ये पाकचे पंतप्रधान इमरान खान यांची त्यांना साथ देत आहे. पाकिस्तान ज्या प्रकारे हालचाली करत आहे त्यावरुन दिसते आहे की पाकिस्तान युद्धाच्या तयारीत आहे किंवा भारताला घाबरवत आहे आणि स्व:ताला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तानचा कलम ३७० रद्द केल्यानंंतर चांगलाच तिळपापड झाला आहे. याचमुळे पाक कारवाया करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून जे सॅटेलाईटची फोटो मिळाले आहेत त्यामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. सॅटेलाइटमधून मिळालेल्या फोटोमुळे वाटत आहे की पाकिस्तानने तीन बंदरावर एक ऑपरेशन चालू आहे, पाकिस्तानच्या ती नौका बंदरावर थांबवण्यात आला आहे. या फोटोवरुन स्पष्ट दिसते की, आरमारामधील जिना नौसेनेचा भाग पूर्णता रिकामा करण्यात आला आहे. ग्वादर बंदर देखील पूर्णता रिक्त करण्यात आले आहे. तर कराची नौसेनेचे डॉकमध्ये तीन जहाज उभे करण्यात आले आहेत. मागील तीन महिन्या आधी हेच सॅटेलाइट फोटो पूर्णता वेगळे आहेत. पाकिस्तानचा रावळपिंडीमध्ये चाकलालाच्या नूर खाना पाकिस्तान एअर फोर्स बेस कॅंप देखील पूर्णता रिक्त करण्यात आले आहे. पाकिस्तान चीनच्या मदतीने युद्धाच्या प्रसंगासाठी बोगदा बनवण्याचा प्रयत्नात आहे. LOC जवळ प्रेशर सेंसरचा वापर करत आहे. भारतात अशांती निर्माण करण्याचा पाकचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते दहशतवादाचा वापर करत आहेत. यामुळे त्यांनी दहशतवाद्याकडे १२.७ MM च्या मोठ्या मशीन गन देखील दिल्या आहेत. या स्टील बुलेट पाकने चीनमधून मागवल्या आहेत. याशिवाय पाकिस्तान रोबोटिक शस्त्रांचा वापर करत आहे आणि दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहेत.  Print


News - World | Posted : 2019-08-11


Related Photos