महत्वाच्या बातम्या

 खासदार अशोक नेते यांच्या कडून विठ्ठलपुर येथे सोनटक्के परिवाराची सांत्वनपर भेट


- गणपुर येथे हजारे बाबु यांच्या मुलाच्या विवाह सोहळा प्रसंगी घरी जाऊन भेट दिले. 

- नाटकांचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चामोर्शी : खासदार अशोक नेते यांचे १८ नोव्हेंबर २०२२ ला चामोर्शी तालुक्यातील विठ्ठलपुर, येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते सोनटक्के (६७) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. या घडलेल्या घटने संबंधीतची माहिती युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे यांनी दिली असता या संबंधितची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन आम्ही तुमच्या सुख:दुःखात सहभागी आहोत. काही अडीअडचणी असल्यास सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन याप्रसंगी केले. तसेच यावेळी विठ्ठलपुर गावातील लोकांनी मंदिरा संबंधित व गावातील इतर समस्या सांगीतल्यावर त्या सुद्धा सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. यावेळी खासदार अशोक नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्नील भाऊ वरघंटे, आदिवासी मोर्चाचे महामंत्री रेवनाथ कुसराम, सरपंच सुधाकर गंधे, उपसरपंच जिवन भोयर, हजारे बाबु, प्रकाश सातपुते, ग्रामपंचायत सदस्य संदीपभाऊ, भोयर पाटील, निलकंठ कुंभरे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos