बल्लारपूरच्या पाणीपुरवठ्यावर प्रशासन गंभीर; संयुक्त बैठकीत उपाययोजनांवर चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी/बल्लारपूर :शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुरळीत व नियमित करण्याच्या उद्देशाने बल्लारपूर नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची संयुक्त बैठक शुक्रवार, दि. १५ मे २०२६ रोजी नगर परिषद कार्यालयात पार पडली. बैठकीत शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान पाणी वितरण व्यवस्था, नियमित पाणीपुरवठा, तांत्रिक अडचणी तसेच नागरिकांना होणारा त्रास याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती मांडली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्णय घेतला.शहरातील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करून भविष्यातील नियोजन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.या बैठकीस नगर परिषद अध्यक्षा सौ. अल्का वाढई, मुख्याधिकारी विशाल वाघ, उपाध्यक्ष तथा स्वच्छता सभापती देवेंद्र आर्य, पाणीपुरवठा सभापती ईस्माईल ढाकवाला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता जगधने, उपअभियंता गोपाल कटके, नगर परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता प्रशांत गणवीर यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




