भंडार्यात दुचाकीवर चारचाकीची धडक : रोजगार सेवक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : ६ एप्रिलला दुपारी १.३० च्या सुमारास सकरला जांब मार्गावर दुचाकीवर जात असलेल्या रोजगार सेवक सुरेश धनराज रामटेके (५२) यांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. अपघातात रामटेके यांचा जागीच मृत्यू झाला.
रामटेके हे हिवरा येथून आंधळगाव पोलिस ठाण्यात मानधन न मिळाल्याबाबत तक्रार देण्यासाठी जात होते. त्यांच्या पत्नी प्रियंका रामटेके यांनी दिलेल्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शहारे करीत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




