महत्वाच्या बातम्या

 गोंदियात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : चिचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव बाजार चौकाजवळ बुधवारी १ रात्री सुमारे ८ वाजतादरम्यान एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाला.

मृताचे नाव उमेद लखन भारद्वाज (४६, रा. सिंदिबिरी, देवरी) असून, तो मोटारसायकल क्रमांक सीजी ०८-एजे ८४५६ ने देवरी येथून सिंदिबिरीकडे जात होता. पोलिसांनी सांगितले की, चारचाकी वाहनाने बारगाव बाजार चौकाजवळ निष्काळजीपणे मोटारसायकलला मागून धडक दिली. या धडकेत उमेद गंभीर जखमी झाला आणि त्याला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात हलवले असता मृत घोषित करण्यात आले.

घटना लक्षात येताच फिर्यादी हरिचंद लखन भारद्वाज ३५, रा. सिंदिबिरी यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे चिचगड पोलिसांनी भादंव्या कलम २८१, १०६ (१), १२५ (ब) सहकलम १८४ मोवाकाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सध्या अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू असून, पोलिस घटनास्थळी साक्षीदारांची माहिती गोळा करत आहेत. अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये धडकी भरली असून, पुढील काळजी घेण्याची मागणीही व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gondia




Related Photos