मनसे नेते नितीन सरदेसाईंची ईडीकडून चौकशी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर ईडीनं मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांची चौकशी सुरू केली आहे. ईडीनं सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार सरदेसाई हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.
ईडीनं या आधी कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उर्वेश जोशी यांची चौकशी केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना समन्स बजावलं होतं. यावरून मनसेचे नेते आक्रमक झाले होते. तसंच महाराष्ट्राचं राजकारण तापलं होतं. २२ ऑगस्टला राज ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास आठ तास राज यांची चौकशी केली होती. आता याच प्रकरणात मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. सरदेसाई आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्यामुळं ईडीच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-09-05


Related Photos