महत्वाच्या बातम्या

 तीन हजारांहून अधिक रूग्णांची महा आरोग्य शिबीरात तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सामान्य नागरिकांना वेळेत व अल्पदरात आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने जिल्हा रूग्णालयात काल 9 फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या आरोग्य शिबीरात एकूण 3 हजार 254 रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये थॅलेसिमीया, थॉयरॉईड, मधूमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग याच्या तपासण्या करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, स्त्रि रूग्णालय, प्राथमीक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्रावर देखील काल रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 95 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, मुख्याधिकारी विनोद जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुवर आदी उपस्थित होते. रूग्णांची तपासणी आणि उपचार करण्याकरिता नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या चिकित्सकांची चमू आली होती. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते शिबिरात दिव्यांग व्यक्तींना बॅटरी वर चालणारे ट्रायसिकल, अपंगत्व चे प्रमाणपत्र तसेच अपंगांन अनुदान राशी चे धनादेश वितरीत करण्यात आले.





  Print






News - Bhandara




Related Photos