भाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   व्यक्तिगत संगणकावर लक्ष ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेण्यात यावा, असा संदेश देत हॅकर्सनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचीच वेबसाईट हॅक केली आहे.   निवडणुकांच्या तोंडावर आम्ही ब्लॅक मनी बाळगणाऱ्या भाजपा नेत्यांची नावे उघड करू, अशी धमकीही हॅकर्सनी दिली आहे. मात्र   वेबसाइट कोणी हॅक केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. 
भाजपाच्या नेत्यांनी जेवढा काळा पैसा लपवून ठेवला आहे आम्ही त्या सर्वांची नावं सार्वजनिक करु. आमच्याकडे भाजपाच्या काळ्या पैशांबाबतचे पुरावे आहेत. खासगीपणा हा आमचा अधिकार आहे. त्यात हस्तक्षेप करु नका. नियम बदला अन्यथा देश सोडा आणि परिणामांना सामोरे जा अशी धमकी हॅकर्सकडून देण्यात आली आहे. मात्र, वेबसाइट हॅकर्सच्या तावडीतून काढून पूर्ववत करण्याचं काम आयटी सेलने तातडीने हाती घेतले आहे. तशाप्रकारचा संदेश आता वेबसाइटच्या होमपेजवर दिसत आहे. 
दुसरीकडे, भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी ट्विटरद्वारे भाजपाच्या आयटी सेलची अशी कोणतीही स्वतंत्र वेबसाईट नाही. भाजपाच्या सर्व वेबसाईट सुरक्षित असल्याचा दावा केला होता. पण एका ट्विटर युजरने नागपूरच्या आयटी सेलचे अध्यक्ष केतन मोहितकर यांच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट काढून मालविय यांचा दावा चुकीचा असून खोटे बोलू नका असं सांगितलं आहे.  Print


News - World | Posted : 2018-12-23


Related Photos