महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : चोरीच्या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरातील नामांकित हॉटेल वैभव येथे असलेल्या कार्यक्रमानिमीत्य फिर्यादी हरीनारायण मंगलप्रसाल पॉल, त्यांचे परीवार व नातेवाइकांसह हॉटेल वैभव येथे वास्तव्यास असतांना रात्रीदरम्यान एका अनोळखी इसमाने दर्शनी भागात असलेल्या खिडकीतून प्रवेश करून फियादी व त्यांचा परीवार गाढ झोपेत असल्याची संधी साधुन फियादीचे दोन मोबाईल व दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र असा एकूण ३ लाख ८१ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निर्देशीत करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी त्यांची पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याचा कसोशीने प्रयत्न केले.

स्थानिक गुन्हे शाखा येथे मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे व त्यांच्या पथकाने बुधाजी मस्लाचार रा. चांदली ता. सावली जि. चंद्रपूर येथील असून आरोपीस माडेतुकुम परीसरातुन ताब्यात घेवून गुन्ह्यासंदर्भात सखोल विचारपुस केले, असता त्याने गुन्ह्याची कबुली देवून त्याने चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos