गडचिरोलीतील वाळू उत्खनन घोटाळा : भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चौकशीची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील साखरा गावासह अन्य भागांमध्ये खासगी शेतजमिनीत पुरामुळे वाळू जमा झाल्याचे दाखवून भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून हजारो ब्रास वाळू उत्खननाची परवानगी मिळवून कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाचे आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केला आहे. या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
जराते यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना वाळू उत्खननाची परवानगी दिली जाते, परंतु काही लोक याचा गैरफायदा घेऊन कोट्यवधींची उलाढाल करतात. याबाबत स्थानिक स्तरावर अनेक तक्रारी असून, महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाशी असलेले संबंध दाखवून काही शेतकऱ्यांनी धमकी देऊन तक्रारदारांना दडपले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेषतः गडचिरोली तालुक्यातील साखरा गावात एकाच कुटुंबाने सातत्याने वाळू उत्खननाची परवानगी घेतली आहे. मात्र, या शेतात पिके घेतली जात नाहीत, कारण वाळू उत्खनन हंगामात शेतात पिके घेणे अशक्य होऊन बसते. याव्यतिरिक्त, वाळू उत्खननाची अनामत रक्कम २५ ते ५० लाख रुपयांपर्यंत आहे, परंतु या रक्कमेचा स्त्रोत काय आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
जराते यांनी या प्रकरणातील सर्व प्रस्ताव तातडीने स्थगित करण्याची तसेच, गडचिरोली जिल्ह्यातील मागील ५ वर्षातील वाळू उत्खनन प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वाळू उत्खनन घोटाळ्याच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दयावी उच्चस्तरीय चौकशी
News - Gadchiroli




Petrol Price




