महत्वाच्या बातम्या

 पोलीस विभागाच्या मदतीने ४ वर्षापासून बंद असलेली बससेवा झाली सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भामरागड : पोलीस अधिक्षक गडचिरोली, अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली, अपर पोलीस अधिक्षक प्राणहिता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या मार्गदर्शनात नवनिर्मित पोमके मन्नेराजाराम प्रभारी अधिकारी उमेश कदम, पोलीस मदत केंद्र मन्नेराजाराम अधिकारी व अंमलदार यांच्या प्रयत्ननाने व पोमके हद्दीतील नागरिकांच्या विनंतीवरुन व महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने सदरची बससेवा सुरु करण्यात आली आहे.

सदर बससेवेचा फायदा हा २० ते २५ गावातील जेष्ठ नागरिक, नागरिक, शाळकरी मुलांना होणार असून, नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. बस चालु झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नागरिकांनी सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे. सदर बस फेऱ्या अहेरी ते बामणपल्ली, बामणपल्ली ते भामरागड, अहेरी ते बामणपल्ली, बामणपल्ली ते भामरागड, भामरागड ते बामणपल्ली, बामणपल्ली ते भामरागड असणार आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos