राज्यातील शाळा १५ जून तर विदर्भातील ३० जूनला होणार सुरू : शिक्षणमंत्री दीपक केसरकर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारला जाहीर केले. त्यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिले.
पालकांना शाळा नक्की कधी सुरू होणार याचा अंदाज असेल तर त्यांना सुट्यांचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. याच हेतूने १५ जूनला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. विदर्भामध्ये जूनमध्ये तापमान वाढलेले असल्याने तेथील शाळा ३० जूनला सुरू होतील.
शालेय शिक्षणमंत्री म्हणाले.
- विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आर्टीफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल.
- विद्यार्थ्यांची सायकोमॅट्री चाचणी सहावीपासून घेण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात १२ लाख विद्यार्थ्यांची चाचणी.
- बालभारती पुस्तकाचे दर वाढले तरी सरकारी शाळांमधील ९० टक्के मुलांना विनामूल्य पुस्तके दिली जातील.
- खासगी शाळा भरमसाट फी आकारतात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल.
आता पुस्तकातच वही
यापूर्वी दारिद्र्य रेषेखालील तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत गणवेष दिले जात होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेष दिले जातील. तसेच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातच प्रत्येक धड्याच्या शेवटी वह्यांची पाने जोडली जातील, असेही केसरकर यांनी सांगितले.
News - Rajy