घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अपात्र प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशाला कृउबास सभापती नितीन कोठारी यांचे सर्वोच्च न्यायालयात आवाहन


- ७ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांना अपात्र केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. दरम्यान जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांनी दिलेला आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर (JUSTICE MS JAWALKAR) यांनी फेटाळून लावला असुन खारीज केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सदर प्रकरणाची पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होत आहे. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशाला घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्या उर्फ नितीन अशोकराव कोठारी यांनी आवाहन दिले असून सदर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. अपिलकर्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्या उर्फ नितीन अशोकराव कोठारी यांनी प्रतिवादी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे, राज्याचे सचिव, विभागीय सह निबंधक सहकारी संस्था अमरावती, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष लोणकर यांचे विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आवाहन याचीका दाखल केली आहे. सद्यातरी सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असुन सदर प्रकरणाची सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होत आहे. गैरअर्जदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांचे तर्फे ऍड. अनघा एस. देसाई यांनी Written Statement दाखल केले आहे.
दरम्यान, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्या उर्फ नितीन अशोकराव कोठारी यांनी त्यांच्या वकीलामार्फत उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात स्थगीती मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणात स्थगीती देण्यास नकार देऊन सदर प्रकरण नियमीत (REGULAR) सुरू करण्यात आले आहे. सदर प्रकरणात २३ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी (JUSTICE JK MAHESHWARI), न्यायमूर्ती अरविंद कुमार (JUSTICE ARVINDKUMAR) यांच्या समक्ष सुनावणी झाली.
पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात होत आहे. सदर प्रकरणात याचिकाकर्ता कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजीचे सभापती भैय्या उर्फ नितीन अशोकराव कोठारी यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ऍड. अरधेंतु माउली प्रसाद, ऍड. अनुराग घरोटे, तर प्रतिवादी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष लोणकर यांच्यातर्फे ऍड. सत्यजित देसाई, ऍड. सिद्धार्थ गौतम, ऍड. अनघा देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष लोणकर यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १७ अन्वये २२ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्या न्यायालयाने अपात्र घोषित केले होते.
दरम्यान, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सभापती अभिषेक ठाकरे (रिट पीटीशन क्रं. ५०४८/२०२४) व आशिष लोणकर (रिट पीटीशन क्रं. ५०५२/२०२४) या दोन संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात धाव घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या आदेशाविरुद्ध आवाहन याचीका दाखल केली. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी सदर आदेश रद्द करुन (७ एप्रिल २०२५) खारीज केला आहे. तसेच दोन्हीही संचालकांना मुळ कार्यालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजीला दिले आहे.
याचिकाकर्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर यांची बाजू वरिष्ठ वकील ऍड. सुनील मनोहर व ऍड. वाय. एन. सांबरे यांनी उच्च न्यायालयात मांडली होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी येथे संचालक अभिषेक ठाकरे व संचालक आशिष लोणकर व इतर शेतकऱ्यांनी १८ डिसेंबर २०२३ रोजी कापसाचा सुरू असलेला लिलाव बंद पाडुन रास्तारोको करण्यात आल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्या उर्फ नितीन कोठारी व इतरांनी केला होता. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीने २७ जानेवारी २०२४ च्या झालेल्या मासिक सभेत ठराव क्रमांक ६ प्रमाणे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर यांना पदावरुन दुर करण्याबाबतचा ठराव १० विरुद्ध ६ मतांनी पारित केला.
सदर आदेशाला विचलीत होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष लोणकर ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आवाहन याचीका दाखल केली होती.
विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. जवळकर यांनी आपल्या आदेशात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ व कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी यांचेवर चुकीची कारवाई केल्याचा ठपका ठेवून ताशेरे ओढले आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. जवळकर यांनी अपात्र संचालक अभिषेक ठाकरे व संचालक आशिष लोणकर यांच्या दोन्हीही याचिका मंजूर केल्या असून याचिकाकर्त्यांना मुळ कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी यांना दिले आहे
विशेष म्हणजे घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रकरणात ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय लागतो. या कडे यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे, हे येथे उल्लेखनीय.
News - Rajy




Petrol Price




