महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही येथे धावत्या बसला आग : सुदैवाने मोठी दुर्घटना टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : राज्य परिवहन महामंडळाच्य M H-40 Q, 6068 क्रमांकाची बस इंजिनमध्ये अचानक आग लागली. ही घटना सिंदेवाही येथील जुना बसस्थानक येथे सोमवारी दुपारी 2.20 वाजताच्या सुमारास घडली. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने कोणतिही दुर्घटना घडली नाही. हि बस ब्रह्मपुरी कडून चंद्रपूरकडे प्रवाशांना घेवून जात होती.

दुपारच्या सुमारास आग लागलेली राज्य परिवहन महामंडळाची बस हि सिंदेवाही बसस्थानक येथून प्रवाशी घेत बस चंद्रपूरकडे निघाली होती. बसमध्ये अंदाजे 40 ते 45 प्रवासी होते. काही अंतरावरील जुना बसस्थानक परिसरात बसच्या इंजिन मधून धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर चालकाने बस थांबविली. नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.





  Print






News - Chandrapur




Related Photos