नंदिगाव जंगल परिसरात सागवान तस्करी, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त


- सिरोंचा वनविभागाची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा  : 
तालुक्यात सागवन तस्करीला ऊत आला असून आज २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तस्करांकडून सागवन लाकुड व दोन वाहने असा एकंदरीत ५ लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
प्राप्त माहितीनुसार सिरोंचा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नंदिगाव जंगल परिसरात सागवान तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या अधिकारी आज पहाटेच्या सुमारास गस्तीवर असताना सागवान तस्करी करणाऱ्या एपी -०१ डी-१३५८ क्रमांकाची टाटा सुमो व टीएस-०३ युए-२५६५ क्रमांकाच्या अ‍ॅटोला अटकाव केला. तस्करांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भनक लागताच अंधाराचा फायदा घेत वनतस्करांनी पळ काढला. वनाधिकाऱ्यांनी दोन्ही वाहनातून सागवान व ५ लाख १९ हजार रूपये किंमतीची दोन्ही वाहने जप्त केली. वनपरिक्षेत्र अधिकारी नारखेडकर यांनी सदर वाहन मालकांचा तपास करण्यासाठी  तेलंगाणा आरटीओची मदत घेतली जाणार  असल्याचे सांगितले.  
सदर कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा वनपरिक्षेत्र अधिकारी नारखेडकर व क्षेत्र सहाय्यक खोब्रागडे, येनघंटी, शेख व वनकर्मचाऱ्यांनी केली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-22


Related Photos