दिव्यांग पुनर्वसन केंद्र उघडणेकरीता स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : केंद्र शासनाच्या सुचनेनूसार गडचिरोली जिल्हयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र उघडणेकरीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. सदर दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याकरीताचा अर्जाचा नमुना जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. बातमी प्रसिध्द झाल्याच्या 21 दिवसाच्या आंत परिपुर्ण अर्ज विहित प्रपत्रात सादर करावे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




