जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील येला येथील शंकर गंगाराम टेकुलवार आणि व्येंकटपुर येथील दर्याबाई पोरतेट यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते . याची माहिती मिळताच जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश डॉ. हकीम यांना दिले.   यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गोडसेलवार, दिवाकर आलाम, प्रभाकर मडावी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-14


Related Photos