महत्वाच्या बातम्या

 मार्कंडा देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घ्या : आमदार डॉ. देवराव होळी


- मार्कंडेश्वर मंदिर पुरातत्त्व विभागाकडून काढून राज्य सरकारकडे घेण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे  पाठवला असल्याची दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विदर्भाची काशी असलेले मार्कंडेश्वर देवस्थान मागील ७-८ वर्षांपासून जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असून पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे अजूनही मंदिराचे व कळसाचे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत  सातत्याने पाठपुरावा करूनही पुरातत्त्व विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे  आपण  राज्याचे जिल्ह्याचे मंत्री म्हणुन, भक्त  म्हणून याकडे जातीने लक्ष द्यावे अशी विनंती आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेत केली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मार्कंडेश्वर मंदिराच्या विकासासाठी ९१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून सदर मंदिर  भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून काढून राज्य सरकारकडे सोपविण्यात यावे असा प्रस्तावही केंद्र सरकारला दिला असल्याची माहिती दिली. यावेळी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी एम. एस. आर. डी. सी. च्या वतीने मार्कंडा देवस्थानाला १०० कोटी रुपये मंजूर करून दिल्याबद्दल व पुरातत्त्व विभागाला ४.५ कोटी दिल्याबद्दल  सरकारचे आभार मानले आहे. मार्कंडा देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी मागील ७-८ वर्षांपासून सातत्याने राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करूनही पुरातत्त्व विभागाच्या आडमुठे पणामुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे  काम थांबलेले आहे. त्यामुळे आपण मंत्री म्हणून याकडे जातीने लक्ष देऊन जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करावे व जे १०० कोटी रुपये विकासाकरिता मंजूर करून दिले आहे तो निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. उत्तर देताना मंत्री सुधीर यांनी मार्कंडेश्वरच्या मंदिराकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे श्री क्षेत्र महाकाली मंदिर, श्री क्षेत्र अंचलेश्वर व श्री क्षेत्र मार्कंडेश्वर मंदिर हे भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून काढून राज्य सरकारकडे सोपविण्यात यावे असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला असून त्याचा मी व्यक्तिशः मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यानी दिली. ९१ कोटी रुपयांचा मार्कंडेश्वर मंदिराच्या विकासाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला असून लवकरच त्यादृष्टीने कामे सुरू करण्यात येतील असेही आश्वासन त्यांनी यावेळी विधिमंडळात आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos