आर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ :
विकास कामांच्या वर्क ऑर्डर काढण्यासाठी कमिशन म्हणून ३० हजाराची लाच रक्कमेची मागणी करून कनिष्ठ लिपिकाच्या मार्फतीने स्वीकारल्या प्रकरणी आर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह कनिष्ठ लिपिकावर अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या कडुन आर्णी पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मुख्याधिकारी करणकुमार आत्माराम चव्हाण ,कनिष्ठ लिपिक चंद्रकांत गुलाबराव  चव्हाण असे लाचखोर कर्मचाऱ्यांचे नावे आहेत . 
तक्रारदाराला आर्णी नगर पालीके अंतर्गत मिळालेल्या एकूण पाच कामांचा वर्क ऑर्डर काढून दिल्याबद्दल व सदर कामात भविष्यात त्रास होऊ नये म्हणून पाच कामांची एकूण रक्कम ३० लाख १ हजार ३९५ च्या १ टक्का याप्रमाणे तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केली व लाच रक्कम कनिष्ठ लिपिक चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्फतीने स्वीकारल्याचे मान्य केले यावरून ९ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण ,लिपिक चंद्रकांत चव्हाण यांच्या विरोधात आर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 
सदर कारवाई अमरावती परिक्षेत्राचे एसिबी चे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके ,पोलीस उपाधीक्षक मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे आणि कर्मचारी सुरेश जगदाळे , अनिल राजकुमार , निलेश पखाले , किरण खेडकर , वसीम शेख ,महेश वाकोडे , सचिन भोयर ,राकेश सावसागडे ,आणि चालक विशाल धलवार आदींनी केली .   Print


News - Rajy | Posted : 2018-10-10


Related Photos