विदर्भ़ न्यूज एक्सप्रेस ला मुक्तीपथचा सर्वाधिक वार्तांकनाचा प्रथम पुरस्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
दारू व तंबाखुमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या मुक्तीपथ या उपक्रमांतर्गत मुक्तीपथ माध्यम पुरस्कार २०१८ - १९ चा सर्वाधिक वार्तांकन - वेब पोर्टल या प्रकारात विदर्भ न्यूज एक्सप्रेसने प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.
आज २६ ऑगस्ट रोजी जिल्हा वर्धापन दिनानिमित्त स्थानिक प्रेस क्लबमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मनिष कासर्लावार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्च संस्था तसेच मुक्तीपथचे संस्थापक डाॅ. अभय बंग, सकाळ चे नागपूर विभागीय सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे, मुक्तीपथचे संचालक डाॅ. मयुर गुप्ता , गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष जयंत निमगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत मुक्तीपथ ने राबविलेल्या उपक्रमांच्या तसेच दारू व खर्रा बंदीसाठी केलेल्या चळवळीच्या बातम्यांना दिलेल्या प्रसिध्दीबद्दल तसेच मुक्तीपथच्या कार्याबद्दल विशेष लिखाण केल्याबद्दल माध्यमांना विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विदर्भ न्यूज एक्सप्रेसनेही या उपक्रमात सहभाग घेतला होता. वेब पोर्टल प्रकारात सर्वाधिक वार्तांकनाचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे. संपादक मनिष कासर्लावार यांनी पुरस्काराचे श्रेय विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या संपूर्ण चमूला दिले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-26


Related Photos