महत्वाच्या बातम्या

  नवोदय विद्यालय घोट येथील जागेचा मार्ग मोकळा


- वनभवन नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षेखाली बैठक संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घोट विद्यालयाच्या जमीनीचा प्रश्न मार्गी लागला असून विद्यालयाच्या जमिनीच्या नाहरकतीला वन विभागाने मंजुरी मिळाली असून भूसंपादनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे आता लवकरच नवोदय विद्यालयाला जमीन मिळणार आहे. तसेच आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, आलापल्ली- मुलचेरा-आष्टी , रेगडी सह प्रमुख रस्त्यांच्या   बांधकामाला वनभवन नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत दिल्याने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. वनभवन नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या या बैठकीला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉक्टर देवराव होळी, यांचे सह वनविभागाचे प्रधान सचिव , विभागातील मुख्य वनसंरक्षक तथा उपवनसंरक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. नवोदय विद्यालयाच्या घोटचा जमिनीचे  हरकत प्रमाणपत्र वनविभागाने न दिल्यामुळे भूसंपादनाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून अडून बसलेला होता. आता त्याला मंजुरी मिळाल्याने जमिनीचा मार्ग निघाली लागला आहे. जिल्ह्यातील आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, एटापल्ली आलापल्ली-आष्टी, इत्यादी प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची कामे वन विभागातील असलेल्या काही अडचणींमुळे थांबलेली असल्याने त्या सर्व अडचणी या बैठकीमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत निकाली काढण्यात आल्या. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी स्वागत केले असून त्यांचे आभार मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos