महत्वाच्या बातम्या

 आ. किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नामुळे मेंदूच्या शस्त्रक्रियेकरिता रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत एक लाखाची मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नामुळे देविदास देशमुख या 58 वर्षीय व्यक्तीला मेंदुच्या शस्त्रक्रियेकारिता मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या निधीतून सदर व्यक्तीवर उपचार केल्या जाणार आहे.

चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारा करिता मोठी मदत केल्या जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन आरोग्य शिबीरे आयोजित केली जात असुन रुग्णांची तपासणी व नि:शुल्क औषधोपचार केल्या जात आहे.

दरम्यान देविदास देशमुख यांचा रोड अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र हि शस्त्रक्रिया महागडी असल्यामुळे त्यांच्या आर्थिक अवाक्याबाहेर होते. त्यामुळे त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करत आमदार किशोर जोरगेवार यांना मदतीची मागणी केली होती. यावेळी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत सदर रुग्णांवर उपचार करुन देण्याची व्यवस्था आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करुन देण्यात आली होती. मात्र सदर योजनेतुन मिळणारी रक्कमही उपचारासाठी कमी पडत असल्याने या रुग्णाला उपचारा करिता मुख्यमंत्री सहायता निधीतुन 1 लाखांचा निधी मंजुर करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली होती. याचा पाठपूरावाही त्यांच्या वतीने सातत्याने सुरु होता. अखेर देविदास देशमुख यांना मेंदु आजारावरील उपचाराकरिता मुख्यमंत्री सहायता निधीतुन एक लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार व्यक्त  आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos