महत्वाच्या बातम्या

 लाहेरी पोलिसांनी घेतली एकात्मतेची शपथ


- लाहेरीत राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांना अभिवादन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

तालुका प्रतिनिधी / भामरागड : भारताच्या पहिल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस तर भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून 2014 पासून साजरा केला जातो. या निमित्ताने उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे राष्ट्रीय संकल्प दिन व राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. 

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी अधिकारी महादेव भालेराव व सीआरपीएफ बटालियन 37 चे असिस्टंट कमांडंट तरुण डोंगरे यांच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडर तरुण कुमार व उप पोलीस स्टेशन लाहेरीचे प्रभारी अधिकारी महादेव भालेराव तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांनी सरदार वल्लभ भाई पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडर तरुण कुमार यांनी उपस्थित सर्वांना एकात्मतेची शपथ दिली त्यानंतर लहरी येथे मोटर सायकल रॅली काढून सर्वाना एकात्मतेचा संदेश दिला. 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता एस आर पी एफ चे दिलीप पाटील तसेच सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक दिनेश पोलीस निरीक्षक शीतला प्रसाद द्विवेदी साहेब तसेच पोलीस हवालदार राजेंद्र भांडेकर सखाराम शेडमाके मपोशी, रत्नमाला जुमनाके, चंदा गेडाम,  वैशाली चव्हाण प्रमिला तुलावी, सगुना पुंगाटी  पोलीस शिपाई गोगलु तीम्मा, भूषण गलगट, कृष्णा, रोशन विडपी मस्के, मानकर यशवंत दानी कुंमरे व एस आर पी एफ व सीआरपीएफ चे अंमलदार आदींनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos