रस्त्याअभावी प्रसूतीसाठी गरोदर महिलेची जंगलातून २३ किमीची पायपीट, मुलीला दिला जन्म


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी (भामरागड) :
  भामरागड तालुक्यात रस्ते व रुग्णवाहिकेच्या अभावामुळे गर्भवती महिला रुग्ण, वृद्धांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अशाच प्रकारे एका आदिवासी गर्भवती महिलेला रुग्णालय गाठण्यासाठी तब्बल २३ किमी पायी प्रवास करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर या महिलेने लोकबिरादरी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. 
नक्षलग्रस्त आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात आजही मुलभूत सुविधांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना अजुनही पायदळ किंवा खाटावरून रुग्णालय गाठावे लागत असल्याचे विदारक चित्र आजही बघायला मिळाले. रस्ते व रुग्णवाहिकेच्या अभावामुळे गर्भवती महिला रुग्ण, वृद्धांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. अशाच प्रकारे एका आदिवासी गर्भवती महिलेला रुग्णालय गाठण्यासाठी तब्बल २३ किमी पायी प्रवास करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर या महिलेने लोकबिरादरी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला.
रस्त्याअभावी प्रसूतीसाठी गरोदर महिलेची जंगलातून पायपीटभामरागड तालुक्यातील तुर्रेमरका या गावातील एका गर्भवती महिलेचा प्रसुती दिवस जवळ आला होता. गावात आरोग्य सुविधा नसल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आशा सेविकेने त्यांना संभाव्य प्रसुती दिवसापूर्वीच रुग्णालय गाठण्याचा सल्ला दिला. मात्र, तिच्यासह कुटुंबियांनी ते मनावर घेतले नाही. रोशनी पोदाडी असे त्या गर्भवती महिलेचे नाव आहे. अखेर ३ तारखेला त्यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. उपचारासाठी त्यांना २३ किमी दूर असलेल्या लाहेरी आरोग्य केंद्रात जायचे होते. मात्र, इथे जाण्यासाठी न धड रस्ता आहे ना कोणती वाहनाची सोय.. पायी जाण्याशिवाय पर्याय नाही.शुक्रवारी रोशनी आणि आशा वर्कर पार्वती उसेंडी यांनी लाहेरीच्या आरोग्य केेंद्रात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना तब्बल २३ किमीचे अंतर जंगलातून पायी चालत जावे लागले. कारण या ठिकाणी रस्ताच नाही. मात्र, लाहेरी येथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच आशा वर्करने त्यांना हेमलकसा येथील हेमलकसा येथील लोकबिरादरी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आणि रुग्ण वाहिकेची सोय करून त्यांना लोकबिरादरीमध्ये दाखल केले. विशेष म्हणजे रोशनी यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत हा रस्ता पार करावा लागला. अशा गर्भवती अवस्थेत त्यांनी तब्बल २३ किमीचा पायी प्रवास केला. त्या ठिकाणी डॉ.अनघा आमटे आणि दिगंत आमटे यांनी रुग्ण महिलेची तपासणी करुन रुग्णलयात भरती केले. मात्र, २३ किमी पायी प्रवास करून ते इथे पर्यंत आल्याने तेही अंचबित झाले. विशेष म्हणजे त्याच दिवश रोशनीची प्रसुती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यानंतर मंगळवारी रोशनीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, लाहेरी ते गुंडनेर नाल्यापर्यंत रुग्णवाहिका जाऊ शकत होती. तिथून तुर्रेमरका हा १८ किमी प्रवास पुन्हा तिला पायीच करावा लागणार होता.. अशा कित्येक मुलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेकांच्या जीवांशी खेळ होत आहे. मात्र याकडे प्रशासन कधी लक्ष देणार हा एकच सवाल नागरिक विचारत आहेत.हेमलकसा लोकबिरादरीचा उपक्रम-गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील गर्भवती रुग्णांसाठी लोकबिरादरीकडून उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आशा वर्कर वेळेत घरी पोहोचू शकत नाही, किंवा जिथे रुग्णवाहिका पोहोचत नाही, अशा भागातील गर्भवती महिलांनी प्रसुतीच्या संभाव्य दिवसाच्या १५ दिवस आधि रुग्णालयात येऊन राहावे, त्यांची जेवणाची सोय केली जाते, तसेच रुग्णासोबत जे नातेवाईक असतील त्याची राहण्याची व ३ वेळच्या जेवणाचीही सोय केली जाते. या उपक्रमाचा महिन्याला ३० ते ३५ महिला फायदा घेत असल्याची माहिती डॉ.अनघा आमटे यांनी सांगितले. मात्र, काहीवेळा रोशनी सारख्या महिला या सोयीकडे दुर्लक्ष्य करत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-08


Related Photos