सोनसरी परिसरात बिबट्याची दहशत, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घेतला घोट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
  लुक्यातील सोनसरी परिसरात  बिबट्याची दहशत कायम असून या बिबट्याने आज १२ नोव्हेंबर रोजी सोनसरी येथील एका गोठयात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घोट घेऊन ठार मारल्याची घटना  पहाटे पाच वाजताच्या  सुमारास उघडकीस आली.  
 पंधरा दिवसापूर्वी सोनसरी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बांधगाव येथील जंगलात या बिबट्याने एका ४२ वर्षीय इसमाला ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज सोनसरी येथील विजय यशवन्त गुरुकर यांच्या गोठयात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घोट घेऊन ठार मारले.  घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.  घटनेची माहिती मिळताच देलनवाडीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास धोंडणे, सोनसरीचे क्षेत्र सहायक चन्नावार, वनरक्षक नन्नावरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.   या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी  केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-12


Related Photos