महत्वाच्या बातम्या

 अहेरी शहरातील कॅन्सरग्रस्त महिलेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी शहरातील मोगलीवार बेगर कॉलनीत राहणाऱ्या ज्योती मोगलीवार ही महिला कॅन्सर या दुर्धर आजराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना पुढील औषधोपचार करणे जड जात होते. अशी माहिती कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळताच त्यांनी कॅन्सरग्रस्त महिला ज्योती मोगलीवार यांना औषधोपचाराकरिता आर्थिक मदत केले.

माहितीनुसार ज्योति मोगलिवार मागील काही दिवसांपासून कॅन्सर या आजाराने पिडीत आहेत. घरची आर्थिक स्थिती खूपच बिकट असल्याने या दुर्धर आजारावरील महागडे औषधउपचार करणे त्यांना आवश्यक होते.

यावेळी कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत करतांना नगर पंचयातचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, शंकर दंडिकवार, आदित्य पुसालवार, विनोद रामटेके, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos