माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायत येथील वर्ग खोली नसल्याने बालकांना शिक्षण घेण्यासाठी अडचण भासत होते. हि बाब दामरंचा येथील सरपंच किरण कोडापे व नागरिक तसेच आविसं काँग्रेसचे कार्यकर्त्यांडून माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे भेट घेऊन अजय कंकडालवार यांना सांगण्यात आले आहे.
नागरिकांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत दामरंचा येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोली मंजूर करून दिले होते. सदर वर्ग खोलीची काम पूर्णत्वास झाल्याने लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली आहे. येथील समस्त नागरिक अजय कंकडालवार यांचे आभार मानले.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, दामरंचा ग्रामपंचायतचे सरपंच किरण कोडापे, ग्रामपंचायत सदस्य वनश्री सिडाम, ग्रामपंचायत सदस्य सुरज सिडाम, मांडराचे माजी सरपंचा तथा विद्यमान सदस्य इंदू कन्नाके, माजी सरपंच जिलकरशहा मडावी, काँग्रेस कार्यकर्ते स्वप्नील मडावी, नरेंद्र गर्गम, सुरेश दुर्गे, दिवाकर आलाम, माजी उपसरपंच संजय पोरतेट, नामदेव पेंदाम, प्रमोद कोडापे, विनोद दूनलावार, कार्तिक अल्याडवार, भास्कर कोडापे, कुमराय्या सुरमवार, मनोज कोडापे, गुरुदास सडमेक, शैलेश कोंडागुर्ले, सचिन पांचाऱ्या, चिंटू पेंदामसह आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli