चंद्रपूर जिल्ह्यातील २ गुन्ह्यात ३७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपींना केली अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, ७ जुलै रोजी ३७ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैधरित्या दारू वाहतूक व विक्री करणारयांचे धाबे दणाणले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोरपना पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना काही इसम एका ट्रकने वणीकडून नांदाफाटा येथे दारूची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोळा फाटो मार्गाजवळ नाकेबंदी करून वाहने तपासणी सुरू केली. दरम्यान, एक ट्रक (क्र. एमएच ३१ सीबी ४७४६) येताना दिसला. सदर वाहनास थांबवून वाहनातील मालाबाबत विचारपूस करून वाहनाची झडती घेतली असता वाहनात २३ लाख १६ हजार रुपये किंमतीची २३९ बाॅक्स देशी दारू आढळून आली. सदर दारुसाठा व वाहतुकीकरिता वापरलेले १० लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण २३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हा पोलिस स्टेशन कोरपना येथे नोंद करण्यात आला असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन रामनगर परिसरात नाकेबंदी करून एका चारचाकी ह्युंडाई सॅन्ट्रो वाहनास ताब्यात घेऊन वाहनासह एकूण ४ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा गुन्हा पोलिस स्टेशन रामनगर येथे नोंद करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओ. जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सचिन गदादे, सहायक फौजदार भोयर, पोलिस नाईक बल्की, अमजद, पोलिस शिपाई सतीश, मिलिंद, नितीन, संजू आतकुलवार, अमोल धंदरे,, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार यांनी पार पाडली.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-07-07


Related Photos