महत्वाच्या बातम्या

  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिवणीपाठ येथे केला रास्तारोको आंदोलन


- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : आल्लापल्ली - आष्टी ३५३(C) या राष्ट्रीय महामार्गावरून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोह प्रकल्पातून लोहयुक्त असलेला चुरा दगड याच राष्ट्रीय मार्गाने दररोज हजारो जडवाहनाची दळणवळण होत आहे. मात्र आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील दुतर्फा रस्त्यालगत असलेल्या शेतांमध्ये लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनामूळे धूळ पसरून उभी पिके पूर्णतः नष्ट झाले, यामुळे शेतकऱ्यांची पिकांची अतोनात नुकसान झाले आहे. मात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी २ जानेवारी २०२३ ते ९ जानेवारी २०२३ पर्यंत साखळी उपोषणाला सुरुवात केली. मात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी ऐन थंडीच्या काळात १० जानेवारी २०२३ ते ११ जानेवारी २०२३ पर्यंत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आले. मात्र तीन महिनीच्या कालावधी लोटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी बांधवांनी आपल्या कुटुंबासह आलापल्ली ते आष्टी ३५३ (C) या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणीपाठ येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोखो आंदोलन करण्यात आले. यावेळी अहेरी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार फारुख शेख यांनी रास्तारोको आंदोलनाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी एक महीन्यात करण्यात येईल असे आश्वासन दिले. या रास्तारोको आंदोलन स्थळी अहेरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक देविदास मानकर, खमनचेरु मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर बोरी तलाठी साजा चे तलाठी प्रविण गाठले, संदिप कोरेत कार्यकारी जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी भाजपा खमनचेरु ग्रामपंचायत चे सरपंच सायलू मडावी, राजपूर पँच ग्रामपंचायत चे सदस्य मधूकर वेलादी, प्रभाकर मडावी, अर्जुन शेंडे, पत्रु ठाकरे, सुरेश आदे, गोपाळ आदे, बाबुराव आदे, नागेश मोहुर्ले, दशरथ निकोडे, बिच्छू कंपेलवार, शंकर निकेसर, यादव कोकीरवार,चंदू मोहुर्ले, फकीरा निकेसर, विलास निकेसर, बापू‌ ठाकरे, दिनेश मडावी यांच्यासह शेतकरी बांधवांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या आंदोलनात पोलीस विभाग यांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos