महत्वाच्या बातम्या

 कलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी तत्पर : आमदार विनोद अग्रवाल


- शहरात विविध ठिकाणी कलार समाज भवनाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : सुरुवातीपासून कलार समाजाने मला सहकार्य केले आहे. समाजासाठी त्यागाची भावना ठेवत ज्या पुढार्यांनी सामाजिक भवनासाठी जागा उपलब्ध केली, बांधकाम केले आणि विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमाने समाजापुढे आदर्श मिर्माण केले त्या सर्वांनी खऱ्या अर्थाने या वास्तूची स्थापना केली. केवळ त्यावर कळस लावण्याचे कार्य करत आहोत, असे विधान आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. ते जिल्ह्यातील कलार समाजाच्या माध्यमाने आयोजित भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. 

स्थानिक गोंदिया शहरात कलार समाजाचे प्रामुख्याने कोसरे कलार, क्षत्रिय कलार आणि जैन कलार समाजाची संख्या अधिक आहे. विविध कलार समाजाच्या संघटना समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असून सामाजिक कार्य करण्यासाठी समाज भवन बांधकाम करिता आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे सामाजिक संघटनांच्या माध्यमाने निधीची मागणी केली होती. त्यावर दुजोरा देत आमदार विनोद अग्रवाल यांच्या माध्यमाने निधी उपलब्ध करून देत आज कोसरे समाज भवनाचे भूमिपूजन तर क्षत्रिय मराठा कलार समाज आणि जैन कलार समाजाचे समाज भवनाचे लोकार्पण करण्यात आले. माजी पालक मंत्री परिणय फुके यांच्या माध्यमाने ३० लक्ष तर आमदार विनोद अग्रवाल यांच्या माध्यमाने २० लक्ष निधी उपलब्ध करून कोसरे समाज भवनाची निर्मिती केली जाणार आहे. 

या भूमिपूजन कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्याचे माजी पालक मंत्री परिणय फुके आणि आमदार विनोद अग्रवाल मंचावर उपस्थित होते. या भवनाच्या बांधकामाकरिता सर्वेश्वर मेश्राम आणि सरस्वती मेश्राम या दाम्पत्याने त्यांची खाजगी जमीन दान केले. याचा जागेवर ५० लक्ष रुपये निधीतून भवनाचे बांधकाम केले जाणार आहे. मराठा क्षत्रिय कलार समाजाच्या माध्यमाने नवयुवक आणि युवती परिचय संमेलन, महिला मेळावा, वैद्यकीय तपासणी शिबिर आणि समाज भवनाचे लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या समाज भवन बांधकामासाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या माध्यमाने २० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. 

कार्यक्रमादरम्यान समाज भवनाचे बांधकाम उत्कृष्टपणे केल्याने भवनाचे निर्माणकार्य करण्यात सहकार्य केल्यामुळे मनीष चौरागडे, मुकेश हलमारे आणि विक्की कावळे यांचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. जैन कलार समाजाच्या माध्यमाने आयोजित समाज भवन लोकार्पण सोहळा, महिला मेळावा, स्नेह संमेलन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भवनाच्या बांधकामासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून २० लक्ष रुपये उपलब्ध करून दिले. या भावनाचे बांधकाम आम्ही करू शकलो कारण समाजाचे पुढाऱ्यांनी याचा पाया रचत जागा मिळवून देण्यापासून तर प्रसस्त परिसर निर्माण केला असून या कार्याचा श्रेय हा त्या पुढाऱ्यांचा आहे असे आमदार विनोद अग्रवाल यांनी भावना व्यक्त केल्या.





  Print






News - Gondia




Related Photos