महत्वाच्या बातम्या

 रस्ता सिमेंटीकरण करण्याकरिता ३५ कोटी केंद्र सरकारकडून मंजूर


- खासदार रामदास तडस यांच्या अभ्यासपुर्ण पाठपुराव्याला यश

- खासदार रामदास तडस यांनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : देवळी नगर परिषद क्षेत्रातल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या जुन्या लांबीचे सिमेंटीकरण करुन देण्याबाबत खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत २७ जून २०१९ ला तारांकित प्रश्न संख्या क्र. ८१ उपस्थित करुन मुद्दा उपस्थित केला होता व सदर प्रश्नाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष पणे उत्तर देऊन सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. दरम्यानच्या काळात कोरोना परिस्थीतीमुळे सदर विषय लांबणीवर पडला होता परंतु खासदार तडस यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण, रस्ता सुरक्षा समिती, संसदीय परिवहन समिती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला या अभ्यासपुर्ण पाठपुराव्याला २६ डिसेंबर २०२२ रोजी यश प्राप्त झाले, असुन देवळी शहरातील विश्रामगृह ते स्मशानभुमीपर्यंत गावातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या जुन्या लांबीचे एकुण ३५ कोटी किमतीचे रस्ता सिमेंटीकरण कार्य केंद्रसरकारकडून मंजुर झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी मिळाले, असुन या निर्णयाचे खासदार रामदास तडस यांनी स्वागत केले.

देवळी शहरातील विश्रामगृह ते स्मशानभुमीपर्यंत गावातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या जुन्या लांबीचे एकुण ३५ कोटी किमतीचे रस्ता सिमेंटीकरण विकासकामामुळे देवळी शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या जुन्या लांबीचा सर्वांगिण विकास होणार असुन या विकासकामामुळे केंद्रसरकारकडून वर्धा जिल्हयाला एक अनोखी भेट वर्ष संपताना प्राप्त झाली आहे, असे म्हणता येईल. रस्ता सिमेंटीकरण होत असल्याने भविष्यात देखील अनेक वर्ष हा रस्ता सुव्यवस्थीत असे, नियोजन करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या माध्यमातुन येवढया मोठया किंमतीचा सलग रस्ता एक सोबत मंजुर करणे व्यवहारीक दुष्टीकोनातुन शक्य नव्हते परंतु भारतीय राष्ट्रीय प्राधीकरनाच्या माध्यमातुन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानुसार हे विकास कार्य मंजुर झाले असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रति तसेच प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या प्ररेणेतुन कार्य करणाऱ्या केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले.





  Print






News - Wardha




Related Photos