महत्वाच्या बातम्या

 मुंबईकरांना वीज दरवाढीचा झटका : खिशाला बसणार कात्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : येत्या १ फेब्रुवारी २०२३ ला देशाचे बजेट मांडले जाणार आहे. त्याआधी मुंबईतील कॉमन मॅनचे महिन्यांचे बजेट कोलमडणार आहे. कारण वीजबिलासाठी त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

सध्याचा सरासरी वीज  पुरवठ्याचा दर (कॉस्ट ऑफ सप्लाय) ७.२७ रुपये प्रति युनिट आहे. हे दर अजून वाढविण्यासाठी महावितरण पाठोपाठ अदानी आणि टाटा यांनीही वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केले आहे.

मुंबईकरांच्या वीज बिलात थोडी थोडकी नव्हे तर ५० रुपयांची वाढ होणार आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांसाठी वीज दरात एक टक्का वाढ प्रस्तावित केले. या याचिकेवर पुढल्या महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात दरवाढ लागू होईल आणि एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना नव्या दराप्रमाणे वीजबिल मिळणार आहे. २०२३-२४ मध्ये इंधन समायोजन शुल्क (FAC) ओझे आणि गेल्या वर्षीपासून वाढत्या कोळशाच्या किमतीमुळे वीजदर वाढ होण्याची शक्यता आहे.





  Print






News - Rajy




Related Photos