महत्वाच्या बातम्या

 नागरिकांना शासनाशी जोडणार ट्रूकॉलर : शासकीय अधिकाऱ्यांचे संपर्क मिळणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : फोनवर येणारे अपरिचित नंबर शोधण्यासाठी ज्या ॲप्लिकेशन्सची मदत घेतली जाते, त्या ॲप्लिकेशन्समध्ये ट्रूकॉलर हे सर्वाधिक लोकप्रिय ॲप्लिकेशन आहे. आता ट्रूकॉलरने नागरिकांना शासनाशी जोडण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ट्रूकॉलरने डिजीटल शासकीय डिरेक्टरीचा समावेश आपल्या ॲप्लिकेशनमध्ये केला आहे. त्यामुळे नागरिक शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकृत फोन क्रमांकावर संपर्क साधू शकणार आहेत. डिजीटल शासकीय डिरेक्टरीमुळे 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा आंतर्भाव करत ट्रूकॉलर युजर्सना हेल्पलाइन, कायदे लागू करणाऱ्या एजन्सी, एंबसी, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स आणि इतर महत्वपूर्ण विभागांचा ऍक्सेस मिळणार आहे.

नेटिझन्स व संबंधित स्टेकहोल्डर्स यांच्यासोबत झालेल्या संभाषणावरुन, फोनवरून होणाऱ्या सर्वात व्यापक स्कॅम्समध्ये तोतया शासकीय अधिकारी बनून फसवाफसवी करण्याचा समावेश असल्याची बाब ट्रूकॉलरच्या निदर्शनास आली आहे. नागरी सेवांमध्ये विश्वास निर्मितीच्या दृष्टीने कोणतेही स्कॅम्स, घोटाळे, आणि स्पॅम्सपासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos