प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


 - जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे राज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले . 
असंघटित कामगार म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तात्काळ सुरु करा, मंडळाच्या कामासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा सुविधा देऊन मंडळ कार्यान्वित करावे, असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव व आर्थिक तरतूद करावी, महाराष्ट्र राज्य असंघटित सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडल स्थापन करा, मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात  धरू नयेत, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात. आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे . 
या धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष रविद्रं कांबळे, उपाध्यक्ष हेमंत अंडेलकर , सचिव लोमेश बांबोळे, कोषाध्यक्ष अनिल बाळेकरमकर, कार्याध्यक्ष धिरज पतरंगे, प्रशांत वाढई, देवेंद्र बारापात्रे, विक्की बढवाईक , राजेंद्र गव्हारे, दिलीप टेकरे, संजय आकरे, संदिप आकरे, पुरुषोत्तम रोडे, अंकुश बोबाटे, किशोर सुर्यवंशी, सचिन आकरे, भास्कर कावळे, जयंत अर्जुनकर,  मारोती बाळेकरमकर, प्रकाश बोबाटे, रमेश गव्हारे, शकंर नैताम, गिरिधर गव्हारे, उमेश सोनटक्के, अशोक दुर्गम सिरोंचा, प्रकाश घोगरे चामोर्शी, पाडुरंग कांबळे घोट, विलास चिलबुले आरमोरी, विक्की गव्हारे यांच्यासह जिल्हाभरातील वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते .    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-25


Related Photos