आष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर, शिपाईच करतात उपचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात आणि फिरते पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत नसल्याने परिसरातील दहा गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
पावसाळ्याच्या दिवसात शेळी, बैल, गाय, म्हैस आदी पाळीव जनावरांवर विविध आजार येत असून गावातील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशु व शेळी पालकांच्या अडचणीत भर पडली आहे. डॉ.कोकरे यांची इतरत्र बदली झाल्यानंतर हा दवाखाना बहूतांश वेळा पशुवैद्यकीय अधिकारीच राहत नसल्याने शिपाईच उपचार करीत असल्याचे निर्दशनास येत आहे. तर सहाय्यक  फिरते पशुवैद्यकीय अधिकारी डॉ बुलकुंडे हे गत काही महिन्यापासून गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नियोजित वेळेत हजर राहत नाहीत. उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात येते तर कधी साहेब दौऱ्यावर गेले आहे असे उपस्थित शिपाई सांगत असतात. सर्व शिपाई दवाखान्यात असताना अधिकारी  हे एकटेच कसे काय दौऱ्यावर जाऊ शकतात ? असा प्रश्न गावातील नागरिकात निर्माण होत असतो. डॉ.कोकरे यांची बदली झाल्यानंतर येथील दवाखान्याचा प्रभार डॉ बुलकुंडे सहाय्यक फिरते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला. सध्या यांच्याकडे दोन्ही दवाखान्याचा चॉर्ज असल्यामुळे एक ना धड भाराभार चिंद्या ची म्हण लागू होत आहे कारण ते मुख्यालयी राहून सेवा देत नसल्याने आणि ते नेहमीच गैरहजर राहत असल्यामुळे गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत शोभेची वास्तू ठरत आहे. अशातच आष्टी येथील खुशाल दुर्गे यानी सरकारी अनुदानातून ४० हजार रूपये भरून एक मैस खरेदी केलि आणि त्या म्हशी च्या थनाला गाठ आल्यामुळे आष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात १०  ते १२ वेळा नेउन नेऊन त्रासुन गेले . शेवटी नाइलाजास्तव त्याना चामोर्शी येथून खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून   शस्त्रक्रिया करावी लागली.  यात त्याना जवळपास १५ हजार रुपयांचा नाहक खर्च सहन करावा लागला आहे. तर गुणवंत निमसरकर यानी सुद्धा सरकारी अनुदानातून म्हैस खरेदी केली. पण काही कारणाने मैस बीमार झाली त्याचे निदान करण्यासाठी वेळेवर डॉ उपस्थित नसल्यामुळे म्हशीचे पिल्लू मरण पावला. यामुळे आष्टी परिसरातील अनखोड़ा, कढोली , रामपुर, बामनपेठ, मार्कंडा, चौड़मपल्ली, इल्लुर, ठाकरी, कुनघाड़ा, चपराळा, रामनगट्टा, आदी आष्टी परिसरातील अनेक शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात. मात्र वेळीच त्यांच्या जनावरांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पशुपालकांची समस्या लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  याची दखल घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद व इतर रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे अशी पशु पालकांची मागणी आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-08


Related Photos