महत्वाच्या बातम्या

 रेल्वे गाडीखाली येऊन युवकाची आत्महत्या : ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गणपती वॉर्ड परिसरातील रेल्वे पटरीवर एका अंदाजे २२ ते २५ वर्षीय अनोळखी युवकाने रेल्वे गाडीखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती वॉर्डच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे पटरीवर युवक रेल्वे गाडीखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविला आहे. युवकाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नंदकिशोर माहूरकर करीत आहेत.





  Print






Related Photos