महत्वाच्या बातम्या

 ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर


- दोन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाने विविध १३ राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल २८ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे.

गुजरात निवडणुका होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोदी दोन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार असून याची जोरदार तयारी शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरु झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते राज्यातील बहुप्रतिक्षित अशा समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. विक्रमी वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे, गेल्या वर्षी या प्रकल्पातील कमान कोसळून मोठा अपघात झाला होता. 

मोदी येत्या ११ डिसेंबरला नागपूर मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाचेही लोकार्पण करणार आहेत. अशाप्रकारे मोदी महापालिका निवडणुकांपूर्वी नागपूरला दोन गिफ्ट देणार आहेत. 

मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाने विविध १३ राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल २८ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे. त्याची परतफेड टोलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

बाजारात जागतिक बँकेसह एशियन डेव्हलपमेंट बँकेपासून जपानच्या जायका इंटरनॅशनल सारख्या संस्था १ ते तीन-साडेपाच टक्के दराने कर्ज देत असतांना एमएसआरडीसीने या कर्जावर तब्बल पावणेदहा टक्के दराने व्याज देण्याची तयारी दर्शविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कर्जाची परतफेडीची मुदत २५ वर्षांची आहे.

महामार्गाची प्रकल्प किंमत कमी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने २३१३ कोटी ५६ लाख रॉयलटीत सूट दिली आहे. तसेच महामार्ग पूर्ण होऊन टोल सुरू होईपर्यंत या कर्जावर ६३९६ कोटी १८ लाख व्याज रस्ते विकास महामंडळ देणार आहे.






  Print






News - Rajy




Related Photos