शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू


- वर्धा जिल्ह्यातिल बोथरा धरणावरील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / समुद्रपुर : 
वर्धा जिल्ह्यातिल समुद्रपुर तालुक्यातील निभा गावातील अरुण थूटे लोक विद्यालयात १० व्या वर्गात शिक्षण  घेत असलेल्या १५ वर्षीय निखिल मारोती चौधरी या विद्यार्थ्यांचा आज १६ सप्टेंबर रोजी  बोथरा धरणात पोहण्यासाठी गेला असताना बुडून मृत्यू झाला आहे. 
आज रविवारची शाळेला सुट्टी असल्याने इत्तर मित्रांसोबत  गावाला लागुन असलेल्या बोथरा धरणावर पोहण्याकरीता गेला होता.  अशातच त्याचा पाण्यात बुडून  मुत्यु झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
मृतक निखीलचे वडील मारोती चौधरी हे अंतरगाव  वरून कुंटुबासह निभा येथे राहायला आले.  त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे.  ते शेतातील कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते.  निखिल आई - वडील सकाळी शेतावर कामाला गेले होते तर शाळेला सुट्टी असल्याने निखिल आपल्या मित्रासोबत गावाला लागून असलेल्या पोथरा धरणात पोहायला गेला होता. माञ पोहता पोहता  तो पाण्यात बुडाला. 
 या घटनेची नोंद गिरड पोलिसांनी घेतली असून घटानास्थळ गाठुन पंचनामा केला.  पुढील तपास ठाणेदार महेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनात अजय वानखेडे करीत आहेत.  Print


News - Wardha | Posted : 2018-09-16


Related Photos