महत्वाच्या बातम्या

 अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती पूर्ववत करण्यात यावे


- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवेदन सादर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : आज ३० नोव्हेंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा गडचिरोली तर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज वडसा येथे केंद्र शासनाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती बंद केले. तरी केंद्र शासनाने ती योजना रद्द करून परत सुरू करावे. याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष आरिफ पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस‌ पार्टीचे शहर अध्यक्ष लतीफ़ शेख, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, शहर अध्यक्ष युवक ईमरान शेख, विधानसभा अध्यक्ष समीर पठाण, डाखराम वाघमारे, मनोज तलमले, हंसराज लांडगे, राशिदुल हक्क, महिला शहर अध्यक्ष नजमा पठाण, तालुका अध्यक्ष प्रतिभा साखरे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos