अवैद्य दारू वाहतुक करणाऱ्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले , ठाणेदार गंभीर जखमी तर २ शिपाई जखमी


- नाकेबंदी करित असतांनी घडली घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
अवैध दारू वाहतुक करित असल्याची गोपनिय माहिती वरून समुद्रपुर - शेंडगाव मार्गावर सापळा रचुन नाकेबंदी करित असतांना अवैध दारू वाहन चालकाने पोलिस गाडी व एका वाहनास उडवुन तिन जणांना जखमी केले.  त्यामध्ये ठाणेदार प्रविण मुंडे गंभीर जखमी झाले . सदरची घटना काल ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या  दरम्यान समुद्रपुर शिवारात घडली.
पोळा सण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. पोलिसांनी अवैघ दारू तस्कराविरद्ध कारवाई सुरु केली होती . त्यातच   ७ सप्टेंबर रोजी  संध्याकाळी ८ वाजताच्या  दरम्यान पोलीस हवालदार अरविंद येनोकर हे जाम चौकात कर्तव्यावर असतांना त्यांना  मिळालेल्या माहितीवरून टाटा बोल्ट कार क्र एम एच ४९ एफ ०७०३ कारचा पाठलाग केला.  परंतु चुकिच्या ' मार्गाने वळुन दारु वाहतुक करणारी कार ही समुद्रपुर शेंडगाव कडे जात असल्याची माहिती फोन वरून ठाणेदार प्रविण मुंडे यांना देण्यात आली.  तेव्हा ठाणेदार प्रविण मुंडे हे  पोलिस गाडी क्र एम एच ३२ जे १८७ चालक कृष्णा इंगळे ,पोलिस शिपाई आशिष गेडाम, वैभव चरडे, उमेश हरणखेडे तर खाजगी वाहन क्र एम एच ३२ ए एच ३१०४ पोलिस उपनिरिक्षक मिलिंद पारडकर पोलीस हवालदार चांगदेव बुरंगे, पोलिस शिपाई विनायक गोडे सह समुद्रपुर - शेंडगाव रोडवरील कालव्याच्या पुढे रोडच्या दोन्ही बाजुनी वाहने उभी करुन पोलीस कर्मचारी वाहनाची तपासणी करित होते.  त्याच वेळी एम एच ४९ एफ ०७०३ भरधाव येत असतांना पोलिस कर्मचाऱ्यांना दिसली पोलिसांनी त्यांना थाबविण्याकरिता हात दिला असता ते थांबत नसल्याने दिसताच पोलिस कर्मचारी रस्त्याच्या बाजुला पळाले व सदर कार ने पोलिस वाहनास उडवुन खाजगी कार ला सुद्धा धडक दिली.  त्यामध्ये पोलिस गाडीमध्ये बसून असलेले ठाणेदार प्रविण मुंडे हे जबर जखमी झाले.    त्यांच्या नाकाचा भाग फ्रॅक्चर झाला तर छातीच्या बरगडी सुद्धा फॅक्चर आहे.  मात्र पोलिस कर्मचारी व पोलिस उपनिरिक्षक थोडक्यात बचावले .  काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले. सदर घटनेमध्ये गाडीला धडक दिल्या नंतर गाडी चालक हा फरार होण्यात यशस्वी झाला . यामध्ये पोलिस गाडीचे जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले व खाजगी वाहनाचे पंन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले तर अवैध दारु वाहतुक करणाऱ्या कार क्र एम एच ४९ एफ ०७०३ मध्ये रॅकेट कंपनीच्या देशी दारूच्या ३० पेट्या किंमत ३ लाख रुपये व कार जप्त केली असुन आरोपी   फरार झाला.
अवैद्य  दारू तस्करी करणाऱ्या कार चालकांने आपल्या जवळील वाहन सुसाट वेगाने चालवुन ते पोलिस कर्मचाऱ्यांचा अंगावर नेत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे व सबोत च असलेले ठाणेदार प्रविण मुंडे यांना जखमी करुण ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन कलम ३०७ , ३३२ सहकलम ६५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन फरार आरोपीच्या शोधात पोलिस रवाना झालेले आहे.
 पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण मुंडे पो. उपनिरिक्षक मिलिंद पारडकर पोलिस हवालदार अरविंद येनोरकर, उमेश हणखेडे चांगदेव बुरंगे , वैभव चरडे, अजय घुसे, स्वप्नील वाटकर, राजु जैयसिंगपुरे , विरु कांबळे विनायक गोंडे, इत्यादी करित आहे.

वाहन मालकांनो सावधान

 वाहन मालक हे आपले वाहन किरायाने देतांना ते वाहन कोणत्या कामासाठी जात आहे,  याची शहानिशा केली जात नाही व यातच गुन्हेगार या वाहनाच्या माध्यमातुन अवैध कारनामे करतांना आढळुुन येतात.  यामुळे वाहन मालकांनी आपले वाहन कशा साठी जात आहे , याची शहानिशा करणे गरजेचे आहे.  यापुढे कोणत्याही अवैद्य कामासाठी वाहन जात असल्याचे आढळल्यास त्या वाहनचालकासह वाहन मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल,  अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव टेळे यांनी दिली.  Print


News - Wardha | Posted : 2018-09-08


Related Photos