महत्वाच्या बातम्या

 क्रूरतेचा कळस : वडिलानेच मुलीची हत्या करून बॅगेत भरून फेकला मृतदेह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / मथुरा : उत्तर प्रदेशमधल्या मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्स्प्रेसवेवर एका ट्रॉली बॅगेत काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्लीतल्या बदरपूर परिसरात रहाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅग भरला आणि ती बॅग मथुरेतल्या यमुना एक्स्प्रेसवर फेकून दिला. ऑनर किलिंगमधून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मृत तरुणीचे नाव आयुषी यादव असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 वर्षांची आयुषी घरातून न सांगता कुठे तरी निघून गेली होती. 17 नोव्हेंबरला ती पुन्हा आपल्या घरी परतली. पण तिला पाहाताच वडिल नितेश यादव यांचा पारा चढला आणि त्यांनी आयुषीला गोळी घातली. यात आयुषीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नितेश यादव यांनी मुलीचा मृतदेह लाल रंगाच्या एका ट्रॉली बॅगमध्ये भरला आणि यमुना एक्स्प्रेस वेवरच्या सर्विस रोडवर ती बॅग फेकून दिली.

18 नोव्हेंबरला दुपारी मथुरा पोलिसांना एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. मृत मुलीच्या डोक आणि हाता-पायावर जखमेच्या खुणा होत्या. तिच्या छातीत गोळी मारण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिासांनी 8 पथके तयार केली. अवघ्या 48 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा तपासा लावला.

याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 20 हजार मोबाईल कॉल्स ट्रेस केले. तसेच जवळपासच्या परिसरातील 210 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच दिल्ली-एनसीआर, हाथरस आणि अलीगड परिसरात पोलिसांनी मृत मुलीचे पोस्टरही चिकटवले. पोलिसांनी गुरुग्राम, आगरा, अलीगड, हाथरस, नोएडा आणि दिल्लीतही तपास केला. याशिवाय व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावरही तिचे फोटो शेअर करण्यात आले. 

पोलिसांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. मृत मुलीचे नाव आयुषी यादव असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. आयुषी यादव ही गोरखपूर जिल्ह्यातील नितेश यादव यांची मुलगी असल्याचे तपासात समोर आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ दोन पथक नितेश यादव यांच्या घरी पाठवली. पण घरात पोलिसांना मुलीची आई आणि भाऊ सापडले, वडिल नितेश यादव हे फरार होते. त्यामुळे पोलिसांना संशय आणि त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तिच्या वडिलांचा कसून तपास केला आणि रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली.

आयुषीचे वडिल नितेश यादव यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे कसून तपास करण्यात आला. आपणच मुलीची हत्या केल्याचे नितेश यादव यांनी कबूल केले. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक आणि मृतदेह फेकण्यासाठी वापरण्यात आलेली कार जप्त केली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos