अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा विचार करावा : डॉ. विश्वजित कदम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
शैक्षणिक शुल्क वाढल्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.
अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजना, नागरी क्षेत्र विकासासाठी देण्यात येणारे अनुदान, पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग, स्वयंसहाय्यता गटासाठी सहायक अनुदान, मुलींसाठी वसतीगृह, मौलाना आझाद मोफत शिकवणी योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अल्पसंख्यांक तरुणांसाठी अभ्यासक्रम सुरू करणे, अल्पसंख्याक बहुलक्षेत्रात तंत्र निकेतन सुरू करणे, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम, उर्दु घर उपक्रम, वक्फ मंडळाच्या योजना आदी विविध योजनांचा आढावा घेतला.
डॉ. कदम म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. केंद्र शासनाच्या अल्पसख्यांक समाजातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमामधील विविध योजनाचा लाभ राज्यातील जनतेला मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठवावेत. नांदेड, मालेगाव, सोलापूर येथे उर्दु घर बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मिरज येथेही अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथेही उर्दु घर बांधण्यासंबंधी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही डॉ.कदम यांनी दिले.  Print


News - Rajy | Posted : 2020-02-02


Related Photos