निहायकल जंगलातील चकमकीत ठार झालेल्या एका नक्षलीची ओळख पटली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अपर पोलिस अधीक्षक डाॅ. हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान पथक तसेच सिआरपीएफच्या १९२ व्या बटालियनच्या जवानांनी राबविलेल्या नक्षल शोधमोहिमेदरम्यान गॅरापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील निहायकल जंगलात चकमक उडाली. या चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या होत्या. यापैकी एका नक्षलीची ओळख पटविण्यात पोलिस विभागाला यश मिळाले आहे.
बबिता नरसु गावडे उर्फ शांताबाई बारसू नैताम (२८) असे  महिला नक्षलीचे नाव असून ती धानोरा तालुक्यातील फुलकोडी येथील रहिवासी होती. ती प्लाटून क्रमांक १५ मध्ये सदस्यपदावर कार्यरत होती. तिच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये १६  गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने चार लाखांचे बक्षिस जाहिर केले होते. दुसर्या मृत महिला नक्षलीची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच जंगल परिसरात शोधमोहिम तिव्र करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-19


Related Photos