महत्वाच्या बातम्या

 लिडकॉमच्या कार्यशाळेत चर्मकार समाजाने शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा : अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : २३ फेब्रुवारी २०२४ रोजी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने सामाजिक न्याय विभाग सभागृह चंद्रपूर, रोड, गडचिरोली येथे लिडकाम सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटक अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार घालण्याल आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र जिभकाटे यांनी केले. महामंडळाची स्थापना, उद्देश व उद्दिष्ट तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य विविध योजनांची माहिती उपस्थित समाज बंधु-भगीनींना सांगून जास्तीत जास्त सख्येने कर्ज योजना, गटई स्टॉल योजना, प्रशिक्षण योजना इत्यादींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष धनाजी पाटील अप्पर जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणांत महामंडळाच्या विविध योजनेचा उल्लेख करून जिल्हा कार्यालयाने केलेल्या कामाचे कौतुक केले. लिडकॉम आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत गांव, खेडे, तालुका या ठिकाणी जावून प्रत्यक्ष गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी करण्यात येणाऱ्या योजनांची त्यांनी प्रशंसा केली. गडचिरोली सारख्या मागास आदीवासी व नक्षलग्रस्त जिल्हामध्ये राबण्यिात येणाऱ्या महामंडळाच्या योजनेचा गरजवंतानी लाभ घेण्याचे त्यांनी आपल्या भाषणांत सांगितले. जिल्हा लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष असल्याने सध्या महामंडळाकडे लाभार्थी येत असल्याने निर्देशनास आले असल्याचेही नमुद केले.

दरम्यान सूक्ष्मपतपूरवठा योजनेच्या सहा लाभार्थ्यांना रु. ५० हजार प्रत्येकी कर्ज मंजूरीपत्र मान्यवरांच्या हस्ते पुष्प देवून स्वागत करून प्रदानक रण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना मंजूरीपत्र मिळालेल्या लाभार्थ्यांना उत्तम व्यवसाय करण्याच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे माहिती देण्यात आली. कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त शेंन्डे यांनी सुद्धा विविध योजनांची माहिती दिली.

या प्रसंगी समाज कल्याणचे वित्त व लेखाधिकारी पंकज तलमले, मीटकॉमचे मेश्राम , MCED च्या पेरके, आय.टी.आय. विविध बँकाचे प्रतिनिधी, समाज कल्याण विभाग व सर्व महामंडळाचे कर्मकारी उपस्थित होते. समाजकल्याण कार्यालयाचे कंकलवार यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेत सर्वांना माहितीपत्रके, दिनदर्शिका वाटप करण्यात आली. कर्जाचे अर्ज भरून घेण्यात आले. MCED चे माहिती पत्रके वाटण्यात आली. असे जिल्हा व्यवस्थापक आर.टी. जिभकाटे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने स्वीप कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित सर्वांनी मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

  Print


News - Gadchiroli
Related Photos