गडचिरोली येथील सर्पमित्रांकडून 2 अजगर सापांना जीवदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जवळील मुडझा गावात रविवारला शेतात काम करीत असताना काही लोकांना साप आढळून आला. त्या सापाला न मारता गडचिरोली येथील सर्पमित्रांना याबाबत माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच लगेच घटनास्थळी जावून 7 फूट लांबीच्या अजगर जातीच्या सापाला पकडण्यात आले. तसेच काल, रात्री 7 वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील विश्राम भवनासमोरील मुख्य मार्गावर 10 फूट जांबीचा अजगर जातीचा साप लोकांना दिसून आला. काही वेळात साप बघायला लोकांनी गर्दी केली होती. काही लोकांनी सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली. या माहितीवरुन लगेच सर्पमित्र अजय कुकडकर, पंकज फरकडे, दैवत बोदिले, मकसूद सय्यद, श्रीकांत कुळमेथे यांनी त्या सापाला पकडले.
आज, 18 नोव्हेंबरला सकाळी पोटेगाव मार्गावरील जंगलात त्या दोन्ही अजगर जातीच्या सापाला सोडून जीवदान देण्यात आले. यावेळी क्षेत्र सहायक प्रमोद जेणेकर, गुलाब मुगल, अजय कुकडकर, पंकज फरकडे, दैवत बोदिले, श्रीकांत नैताम, गणेश देवावार, प्रशिक झाडे, राकेश नैताम, शिवम जुवारे आदी उपस्थित होते. हिवाळयाच्या दिवसात अजगर साप बाहेर निघतात. साप निघाल्यास त्या न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-18


Related Photos