चकमकीत ४ ते ५ नक्षली जखमी झाल्याची शक्यता, नक्षल्यांनी घडविले दोन स्फोट


- शस्त्रे, साहित्य जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागातील गट्टा जां. पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील येलदडमी जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी शोधमोहिम राबवित असताना आज २० ऑगस्ट रोजी नक्षल्यांसोबत चकमक उडाली. यावेळी नक्षल्यांनी दोन भुसुरूंक स्फोट घडवून आणले.   चकमकीत ४ ते ५ नक्षली जखमी असण्याची शक्यता आहे. नक्षली कॅम्प उध्वस्त करण्यात आले असून शस्त्रे व अन्य नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
जंगल परिसरात नक्षल्यांनी कॅम्प तयार करून कॅम्पच्या सभोवती दोन भुसुरूंग पेरून ठेवले होतेे. पोलिस पथकाला पाहताच नक्षल्यांनी स्फोट घडवून आणले. यानंतर गोळीबार सुरू केला. सी - ६० च्या जवानांनी नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावत नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले. घटनास्थळावर पाहणी केली असता १ रायफल, क्लेमोर, वायर तसेच भुसुरूंग घडवून आणण्याचे साहित्य, पिट्टू, दैनंदिन वापराचे साहित्य आढळून आले. या चकमकीत चार ते पाच नक्षली जखमी झाले असण्याची शक्यता आहे. परिसरात शोधमोहित तिव्र करण्यात आली आहे. जवानांच्या कार्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-20


Related Photos