महत्वाच्या बातम्या

 सुशिक्षित व कर्मचारी वर्गाने महात्मा फुलें आणि बाबासाहेबांचे आंदोलन पुढे चालवावे : डॉ अभिलाषा गावतुरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : गेल्या १३ वर्षापासून सतत बीएसएनएल सेवा व बीएसएनएल परिवार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे कर्मचारी एकत्र येऊन महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी घेतात. यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात बीएसएनएलच्या प्रशासकीय बिल्डिंग परिसरात साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बीएसएनएल चे महाप्रबंधक उद्योग प्रांजल ठाकूर तसेच प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ व भूमिपुत्र ब्रिगेडचे संयोजक डॉ. अभिलाषा गावतुरे तसेच बीएसएनएल चे उपप्रबंधक काजल डे वित्त तसेच उपप्रबंधक धोंगडे मंचावर उपस्थित होते.

बुद्ध वंदना तसेच संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य वक्ता म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे व प्रेरणेने कर्मचारी वर्ग या देशात तयार झाला. आणि खूप मोठी जबाबदारी बाबासाहेब देऊन गेले. दुधावरच्या सायी प्रमाणे या वर्गाने आपल्या समाजाचा संरक्षण करायला हवं तसेच देश हितासाठी एक चांगला समाज व चांगला देश निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या हातात घ्यायला हवी असे म्हणले. महाप्रबंधक ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बाबासाहेबांच्या कार्याची महती मांडली तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा आपले कर्तव्य व जबाबदारी जाणली पाहिजे असं ते बोलले. काजल डे यांनी सुद्धा महात्मा फुले व डॉ बाबासाहेब यांचे महिलाउन्नती साठी विशेष योगदान होते. संचालन राजेश कमाने तर आभारप्रदर्शन सुमंत मेश्राम यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन सेवा बीएसएनएल च्या  पुढाकाराने व बीएसएनएल परिवार बिजनेस एरिया चंद्रपूर तर्फे करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रामुख्याने शरद नन्नवरे अभिजीत जीवने, बी. सी. कोल्हे आणि सेवा बीएसएनएलचे माजी पदाधिकारी रमेश रामटेके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






  Print






News - Chandrapur




Related Photos