महत्वाच्या बातम्या

 शास्त्रज्ञांचा धक्कादायक अहवाल : करोनातून बरे झाल्यानंतरही १८ महिन्यानंतर होऊ शकतो मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : जगभरात करोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केले आहे. त्यात चीन, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांचा सहभाग आहे. अशातच आता करोना संदर्भात आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर १८ महिन्यानंतर या विषाणूमुळे मृत्यू होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी नव्या अहवालाच्या आधारे हा दावा केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शास्त्रज्ञांनी नव्या अहवालानुसार दावा करत म्हणाले, करोना महामारीदरम्यान अनेक प्रकरने समोर आली आहेत. ज्यामध्ये करोनाला संसर्गावर मात केल्यानंतर काही दिवसांनी लोकांचा मृत्यू झाला. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी नवीन अहवाल प्रकाशित झाला आहे. या संशोधनानुसार, करोनाबाधित रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांची अधिक लक्षणे आढळून आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. १ लाख ६० हजार लोकांवर संशोधन करुन हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
चीनच्या हाँग विद्यापीठाचे प्रोफेसर इयान सीके वोंग यांनी सांगितले की, “संशोधनाच्या निष्कर्षांवरुन कोविड-१९ चे रुग्ण या संसर्गातून बरे झाल्यानंतर किमान एक वर्ष त्यांचे निरीक्षण केले पाहिजे.” या अहवालानुसार, कोरोना संसर्ग न झालेल्या लोकांपेक्षा कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये संसर्गातून बरे झाल्यावर पहिल्या तीन आठवड्यांत हृदयविकाराने मृत्यूची शक्यता ८१ पटीने जास्त होती. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर १८ महिन्यांनंतर मृत्यूची शक्यता पाच पटीने जास्त होती.
अहवालानुसार, कोरोना रूग्णांना गंभीर हृदयविकार होण्याची शक्यता जवळजवळ चार पट जास्त होती. असंक्रमित रुग्णांपेक्षा संक्रमित गटामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ४० टक्क्यांनी जास्त होती. कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये गंभीर हृदयविकार होण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. 

  Print


News - Rajy
Related Photos